भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातुन मालन काकु वसंतराव काळे(आईसाहेब)यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाळवळी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्त आज पंढरपूर येथे अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. सोसायटी मतदारसंघातून विरोधकांच्या गटातून एकही अर्ज नसल्यामुळे व काळे गटातून मालन काकू काळे यांचा अर्ज होता.
त्यामुळे सोसायटी मतदारसंघातून मालन काकू काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवडीमुळे काळे गटातून विजयी सलामी दिल्याचास आनंद सभासदांमधून व्यक्त करण्याताना दिसून येत आहेत.