पंढरपूर प्रतिनिधि नंदकुमार देशपांडे
आपले शरीर निरोगी राहण्यासाठी सायकल चालवणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे सायकल चालवण्याने संपूर्ण शरीराला व्यायाम होऊन शरीर निरोगी व सुदृढ राहते सध्याच्या जमान्यांमध्ये मुलांचा कल सायकल चालवण्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळण्यात व इतर खेळण्यात व्यस्त होतो त्यापेक्षा सध्याची तरुण पिढी सायकल चालवण्याकडे कशी वळली जाईल याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ तर पंढरपूर चेA.A. खंडागळे यांनी केले.
येथील हुतात्मा स्मारक मंदिरामध्ये जागतिक सायकल दिवस व सायकल क्लब चा पाचवा वर्धापन दिन तसेच विधी सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायकल क्लबच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध भागातून व शहरातील आलेल्या सायकल प्रेमी सायकल पटूंचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी 80 वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक व सायकल चालवणारे यांचा सन्मान आहे न्यायाधीश साहेबांच्या हस्ते करण्यात आला.
या सर्वांकडे पाहिल्यानंतर आम्हालाही यापुढे सायकल चालवावी असा मोह झाला आहे असे शेवटी श्री खंडागळे यांनी सांगितले. अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एडवोकेट अर्जुन पाटील बोलताना म्हणाले येथे उपस्थित असलेले सायकलपट्टूकडे पाहिल्यानंतर आम्हाला लाजल्यासारखे वाटते आजही या 80 व्या वर्षात सायकलवर रनिंग करणारे चालवणारे पाहिल्यानंतर आपणही सायकल चालवली पाहिजे सायकल चालवणे त्यामुळे शरीर निरोगी राहते असे सांगितले यावेळी डॉक्टर मनोज भाईगुडे व दहक कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील प्रमुख पाहुणे होते .
या कार्यक्रमानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्ष जोपासना व्हावी याकरता दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री खंडागळे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे विधी सेवा संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील डॉक्टर मनोज पायगुडे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास शहरातील सायकल प्रेमी व मध्यमवयांपासून ते 80 वर्षापर्यंत सायकलिंग करणारे सायकलपटूही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
या कार्यक्रमास पी एल व्ही सदस्य एडवोकेट शिवाजी वाघमारे. पांडुरंग अल्ला पुरकर विष्णू मैंदर्गीकर. नंदकुमार देशपांडे वकील संघाचे सचिव राहुल बोडके यांचे सह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा चंद्रराव व सचिन कदम यांनी केले तर सर्वांचे आभार महेश भोसले यांनी मांडले