मुंबई प्रतिनिधी
२०१६ पासून आरटिई मान्यते शिवाय चालणाऱ्या भक्ती वेदांत स्वामी मिशन स्कूल या शाळेवर कारवाई व द्रव्यदंड वसुल न करता व शाळेवर गंभीर स्वरूपाची कारवाई सुरू असताना सुद्धा शाळा प्रशासनाला पाठीशी घालुन अवैध रीत्या आरटिई मान्यतेची शिफारस केल्या प्रकरणी शिक्षण निरिक्षक पश्चिम श्री वणवे यांना बीएमसी शिक्षण विभागाने नोटिस पाठवुन खुलासा मागितला आहे.
भक्ती वेदांत स्वामी मिशन स्कूल या शाळा प्रशासना विरोधात आरटिई मान्यता शिवाय शाळा चालवणे, चुकिची पिटिए शुल्क घेणे, आरटिई मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून गणवेश व पुस्तकांचे पैसे घेणे, अशा विविध तक्रारी पालक शितल झांबरे यांनी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी शिक्षक पालक महासंघाचे नितीन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाकडे २०२१ पासून तक्रारी केल्या होत्या व या तक्रारी संबंधित पाठपुरावा श्रीमती झांबरे व महासंघाचे नितीन दळवी हे करत होते.
शाळा प्रशासनाने २०१६ पासून आरटिई मान्यता घेतली नसल्याची मुख्य तक्रार होती, *एखाद्या शाळेस आरटिई मान्यता द्यायची असताना आरटिई कायद्या प्रमाणे त्या शाळे विरुद्ध कुठल्याही तक्रारी व आक्षेप प्रलंबित असता कामा नये, पण या शाळे विरुद्ध गंभीर तक्रारीवर कारवाई सुरू असताना आणि त्याची पुर्णपणे जाणिव असताना देखील या शाळेला २०१६ ते २०१८ ची आरटिई मान्यता देण्याची शिफारस पश्चिम शिक्षण निरीक्षक श्री वणवे यांनी बीएमसी शिक्षण विभागाकडे केली आणि बीएमसी शिक्षण विभागाने शाळेला आरटिई मान्यता दिली देखील. आरटिई मान्यता शिवाय २०१६ पासून शाळा चालविल्या बद्दल कारवाई व दंड पण शिक्षण निरिक्षक श्री वणवे यांनी शाळेवर केला नाही व हा सर्व प्रकार शाळा प्रशासनाला पाठिशी घालण्यासाठी शाळेशी संगनमत करून केला गेला असा आरोप महासंघाचे नितीन दळवी यांनी केला आहे.
शाळेला आरटिई मान्यता देण्यापूर्वी महासंघाचे नितीन दळवी यांनी शाळा प्रशासनाच्या तक्रारी संबंधित शिक्षण निरीक्षक श्री वणवे यांची पाठपुराव्या साठी भेट हि घेतली होती तरी शाळेला अवैधरित्या मान्यता देण्यात आली.
गंभीर स्वरूपाच्या तक्रारी सुरू असताना व त्याची पुर्णपणे जाणिव असताना शाळा प्रशासनाला Acts रीत्या मान्यता दिल्या प्रकरणी शाळेवर व शिक्षण निरीक्षक वणवे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महासंघाचे नितीन दळवी यांनी केली आहे तसेच मान्यता नसलेल्या कुठल्याही शाळेस कारवाई करुन आणि दंड वसूल करुनच आरटिई मान्यता द्यावी हि मागणी देखील आहे.