पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी येथे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे खजिनदार सलीम वडगावकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ॲड.वैभव टोमके हे होते. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये समृध्दी सलगरकर,सृष्टी पाटील,साक्षी चव्हाण, सौरभ मासाळ, गौरव काळे, वैभवी पालसांडे, ऋतुजा राजगुरु, पुनम कटके, सविता जाधव, गौरव काळे, जुनेद इनामदार, दिपाली पवार या गुणवंतविद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल व प्रशालेच्या निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ,सहसचिव अजित नडगिरे, ज्येष्ठ संचालक आप्पा चोपडे, मुकुंद देवधर,दिलीपआप्पा घाडगे,अनिरुद्ध सालविठ्ठल, विजय माळवदकर यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमासाठी प्र.प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे,पर्यवेक्षक सुनील पाटील, अशोक पवार,विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, संजय पवार, अधीक्षक अमोल हुंगे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजुभाई मुलाणी यांनी केले आभार सुनील गुरव यांनी मानले.