मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
एक सुसंस्कृत , कर्तव्यदक्ष, परोपकारी, अभ्यासूपणाने हाती घेतलेले सामाजिक कार्य पाठपुरावा करून सिध्दीस नेणारे कर्तबगार व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणा-या समाजसेविका सुरक्षा शशांक घोसाळकर यांना दैनिक प्रहारचे संपादक डाँ. सुकृत खांडेकर यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद व आदर्श मुंबई वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय भारतरत्न गौरव श्री २०२३ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या आदर्शकांचा गौरव करण्यात आला.
धर्मवीर आनंद दिघे सभागृह, विक्रोळी (पूर्व) येथे आयोजित या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय व्याख्याते डाॕ. पवन अग्रवाल, विक्रोळी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शुभदा चव्हाण, आदर्श मुंबईचे मुख्य संपादक डाॕ. संजय भोईर, सहसंपादक पूनम पाटगावे व सहकारी पत्रकार उपस्थित होते.