पंढरपूर प्रतिनिधी
भारती विद्यापीठ पुणे मार्फत फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी इंग्रजी ॲडव्हान्स परीक्षेमध्ये विवेक वर्धिनी विद्यालयातील सौरभ सिताराम मासाळ या विद्यार्थ्यांचा राज्यामध्ये तृतीय क्रमांक आला आहे.
दरवर्षी प्रशालेमध्ये बाहिस्त परीक्षा घेण्यात येतात यावर्षी या इंग्रजी भाषेत परीक्षेसाठी 70 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 13 विशेष प्राविण्य व चार विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आले आहेत त्यात सौरभ ने राज्यात पाहिल्या तीन मध्ये यश मिळवले आहे.भारती विद्यापीठाकडून त्याला पाचशे रुपयाचे बक्षीस देण्यात आले आहे.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ .मदन क्षीररसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर,प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे, पर्यवेक्षक सुनील पाटील,मुख्य लिपिक हनुमंत मोरे,मार्गदर्शक शिक्षक सिताराम मासाळ, देविदास चेळेकर, बाळासाहेब करपे, दिलीप रानगट्टे, मगन सुळे, प्रेम खेडकर, सहशिक्षक राजुभाई मुलाणी,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.