पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ३ मे रोजी स्टुडन्ट असोसिएशन्स मार्फत गेस्ट लेक्चर ऑन कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस अँड ऑपॉर्च्युनिटी इन सिव्हील इंजिनिअरिंग या विषयावर सुनील फुरडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
सुनील फुरडे हे फुरडे कन्स्ट्रक्शन चे मालक असुन क्रीडाई ऑल इंडिया लेवलचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. यांचे व्याख्यान पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान महाविद्यालयाच्या वतीने सुनिल फुरडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना सुनिल फुरडे म्हणाले, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्वतःचा व्यवसाय, नोकरीच्या संधी विविध विषयावर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांच्या संकल्पनेतून हे व्याख्यान आयोजित केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील प्रा. शेखर पाटील, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. गणेश लकडे यांचे सहकार्य लाभले.