भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम 2023-24 साठी तोडणी वाहतूक ठेकेदाराचे करार करण्यास आज कारखाना कार्यस्थळावर प्रारंभ करण्यात आला.
यावेळी तोडणी वाहतूक कमिटीचे चेअरमन भारत कोळेकर, मोहन नागटिळक, बाळासाहेब कौलगे, नागेश फाटे, अण्णा शिंदे, योगेश ताड, शेतीअधिकारी गळूमकर, उपशेतीअधिकारी थोरात, व वाहन मालक उपस्थित होते.