पंढरपूर प्रतिनिधी
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आपल्या श्री विठ्ठल सह.साखर कारखाना येथे बायो - सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा रविवार, दि.७ मे २०२३रोजी सकाळी ९ वा. कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.
यावेळी पवार साहेबांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केली असता साहेबांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.