आजपासून बाल मित्रांना सुट्टीचा आनंद मिळावा म्हणून स्पेशल सदर सुरू करीत आहोत.याचा उपयोग करून घ्यावा हि विनंती
चला जाऊ या, बालुडयाच्यां नगरी
------------------------
*बाल गीत-गाणी*
(१)
--------------------------------
*ढगुडयाचीं धमाल*
---–--------
निळया निळया आकाशी, भरली होती जत्रा
ढगुदादा,ढगुताई,ढगुडे आले सतरा बतरा
धमाल मस्ती वार्यामामा संगे एवढी झाली सुरु
इकडचा तिकडे, तिकडचा इकडे, काही खाली वरु
वारु मामा खटयाळ भारी, सुकलेल्यानां फुगवी
फुगली एकदा ढगुडी ढुगुडी कि मग त्याच्या संगे उडवी
ढगुडी ढुगडी दात विचकुन मोठ मोठयाने कडाडे
जमिनीवरती माणसं घाबरुन दाणाफाण उडे
पाहुन सारे ढगुडी ढुगुडी, गडगडाटी हासे
वारु मामाच्या संगतीने मग,निळे काळे आभाळ भासे
मस्ती चाले ढगुडयाचीं एवढी खणाखणा
निळया आभाळात आवाज उठे दणादणा
बोट लावुन गुदगुल्या, हासुन सारे बेजार
हसुन येई डोळयात पाणी,पडे मुसळधार,
त्याचा होई पाऊस, आणि पाऊस पडे मुसळधार
जमिनीवर पाऊस पडे मुसळधार
------
*रचनाकार कवी*
*तुमचाच नवनाथ मामा*
*नवनाथ अर्जुन पा गायकर*
*आहुर्ली,पो.सांजेगाव,ता.ईगतपुरी, जि.नाशिक*
*४२२ ४०२**मो.नं. ९८८१३२९७०९,९७६३८२७७०८*
*ईमेल-9nathgaikar@gmail.com*
( *आपल्याला बाल गीत-गाणी कशी वाटली हे अवश्य कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियाचीं नक्की वाट पाहु....*🙏)
चित्र काढून सुंदर रंगवा