पंढरपूर प्रतिनिधी
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो, सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील इंदूर संस्थानात अहिंसा, धर्म, नीती, न्याय प्रस्थापित केले. कुशल प्रशासक, चाणाक्ष नेतृत्व, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक श्री.संजय मालक आवताडे हे उपस्थित राहून त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सदर प्रसंगी अहिल्याबाई होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समिती अध्यक्ष श्री.माऊली भाऊ हळनवर,नगरसेवक श्री.आदित्य फत्तेपूरकर,श्री. सोमनाथ ढोणे,श्री.राहुल गावडे,श्री. पांडूरंग वाडेकर,श्री. प्रशांत घोडके,श्री. बबन येळे,श्री.संतोष बंडगर,प्रवीण सलगर आदी मान्यवर उपस्थित होते.