सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटचे, एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव- सोलापूर यांच्यातर्फे व्हीलॅब(शिक्षण मंत्रालय यांचा आयसीटीच्या माध्यमातून राष्ट्रीय मिशन अंतर्गत असलेला उपक्रम) व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ व १० मार्च २०२१ रोजी *"व्हर्च्युअल लॅबचा वापर"*(आभासी प्रयोगशाळा) या विषयावर ऑनलाईन दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक डॉ. आय एम चंदरकी यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सीओईपी टेक्नॉंलॉजीकल युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ.सुधीर आगाशे व प्रा.आऊटरीच कोऑरडीनेटर अमोद हरणखेडकर (सीओईपी)पुणे, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. एस. एम. जगदे, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. विनोद खरात, मुख्य समन्वयक डॉ. इम्रान चंदरकी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.आय एम चंदरकी यांनी केले. व कार्यशाळेची माहिती देताना म्हणाले की व्ही लॅब च्या माध्यमातून संकल्पना नीट समजून घेता येतात पारंपरिक लॅब मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या या व्ही लॅबद्वारे दूर होतील.
या कार्यशाळेसाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागातील विविध विषयाचे तज्ञ समन्वयक प्रा.राहुल होनकळस (मेकॅनिकल इंजीनियरिंग), प्रा.एम टी शिंदे(इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग), प्रा.अरुणा गुंजे (सीएस़ई), प्रा.मोहिनी नवले(ई एन टी सी) प्रा.लक्ष्मी जंगम (सिव्हिल इंजिनिअरिंग),डॉ.सुवर्णा क्षिरसागर (भौतिकशास्त्र) यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विषयानुसार व्हर्च्युअल लॅबचे प्रात्यक्षिक कशा प्रकारे ऑनलाईन करू शकतो याबद्दल सखोल माहिती व मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यशाळेमध्ये ८८३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.व एकूण १८८५ प्रयोग व्ही लॅब द्वारे करण्यात आले. अशी संयोजकांनी माहिती दिली.
याप्रसंगी सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,की व्हर्च्युअल लॅब ही काळाची गरज असून येणाऱ्या काळात व्हर्च्युअल लॅब चा वापर हा सर्रासपणे होणार असून विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा.
या कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते मार्गदर्शक श्री.अमोद हरणखेडकर आउटरिच को-ऑरडीनेटर सीओईपी पुणे यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल प्रयोगशाळेचा उद्देश काय व व्हर्च्युअल लॅबचे कार्य कसे असते सिस्टीम व्हर्च्युअल लॅब या काळात किती उपयुक्त आहे.त्याचे फायदे काय आहेत.याचा फायदा घेण्यासाठी व्हर्च्युअल लॅबचा ऑनलाइन प्रात्यक्षिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.vlab.ac.in या वेबसाईट वापर करावा व जास्तीत जास्त उपयोग करावा व फायदा घ्यावा असे सांगितले या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले व सखोल मार्गदर्शन माहिती प्रा.अमोद हरणखेडकर यांनी दिली.
या कार्यशाळेचे समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. एस. एम. जगदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.