भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासद व मागील गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावली सणानिमित्त कुपनाव्दारे कारखाना कार्यस्थळावर आणि पंढरपूर येथे साखर वाटप करण्याचे धोरण सहयोगी ओंकार शुगर कार्पोरेश याचेशी चर्चा करुन निश्चित करण्यात आले आहे.जाहिर केल्याप्रमाणे मागील गळीतास आलेल्या ऊसास रु.100/- चा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मागील सिझनमध्ये जिल्हयात सर्वाधिक दर दिलेला असून, चालु गळीत हंगामात जिल्ह्यातील इतर कारखान्याचे बरोबरोबरीने ऊस दर देण्यात येईल. गळीत हंगामाचे सुरुवातीपासून ते सन 2023 अखेर ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे कारखान्याची थकित येणेबाकी आहे, अशा थकबाकीदारांच्या थकित रक्कमेवर 25 टक्के सवलत व संपुर्ण व्याज माफ करण्यात येणार असून, सर्व थकबाकीदारांनी दोन महिण्याच्या आत आपला ऊस गळीतास देवुन/ रोखीने थकित रक्कमा भरण्यात यावा व मुदतीत या सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच कामगारांनी आजअखेर प्रामाकिपणे केलेल्या कामाचा परिश्रमांचा विचार करुन सरसकट सर्व कामगारांना 20 टक्के पगार वाढ करण्याची संचालक मंडळाने शिफारस केली असल्याचे सांगितले.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन 2025-26 या आर्थिक वर्षाची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा माझ्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेतील सर्व विषयास व एनवेळीच्या विषयासही उपस्थित सर्व सभासदांनी अवाजी मताने मंजूरी देण्यात आली. विषयाचे वाचन प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी केले.
प्रारंभी माजी व्हा.चेअरमन मारुतीदादा भोसले, विठ्ठल कारखान्याचे मा.संचालक उत्तमकाका नाईकनवरे, मा.पंचायत समिती सदस्य् सुरेश देठे, जेष्ठ माजी संचालक बाळासाहेब कौलगे, प्रताप म्हेत्रे, संचालिका सौ.उषाताई माने यांचे शुभहस्ते मान्यवरांचे उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन श्रीविठ्ठल व संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक शंकरमहाराज चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तदनंतर संचालक युवराज दगडे यांनी श्रध्दांजली ठराव मांडला.
संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे व त्यांचे सहकारी यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या ऊसास किफायती दर आणि परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी उभारणी केलेल्या या संस्थेवर आज हजारो कुटुंबीय उदरनिर्वाह करीत असून, ही संस्था टिकुन रहावी, यासाठी मागील वर्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक व सर्व सभासद यांचेवतीने कारखाना सहयोग तत्वावर चालविणेत येत आहे. मागील काही हंगामापासून अनेक अडचणींचा सामना करत, सभासदांचे, कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवुन आम्ही सर्व सहकारी संचालक अथक परिश्रम करीत आहोत.
सहयोग ओंकार शुगर कार्पोरेशनच्या माध्यमातुन अहवाल सालात कारखान्याने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाची व्याजासह एकूण 4720.18 लाख परतफेड केलेली असून, उर्वरीत कर्जही ओटीएस स्कीम अंतर्गत लवकरच भरणा करण्यात येणार आहोत. वैयक्तीक फायद्याचा विचार न करता सर्वाचे हित डोळ्यासमोर ठेवुन सहयोग तत्वावरील चालविणेचा निर्णय योग्य असून, लवकरात लवकर आपला कारखाना कर्ज मुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक करीत आहोत. चालु गळीत हंगामामध्ये जास्तीत-जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहन नागटिळक, माजी व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक सर्व श्री गोरख जाधव, राजाराम पाटील, दिनकर कदम, नागेश फाटे, योगेश ताड, युवराज दगडे, परमेश्वर लामकाने, जयसिंह देशमुख, संतोषकुमार भोसले, सुनिल सराटे, अमोल माने, अरुण नलवडे, राजाराम जगदाळे, विश्वास उपासे, भारत आंबुले, जोतीराम पोरे, दिनकर डोंगरे, बाळु माने, महादेव देठे, शिवाजी मदने, आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, सर्व अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेस उपस्थितांचे आभार व्हा.चेअरमन मोहन नागटिळक यांनी मानले तर सुत्रसंचलन गणेश वाघमळे यांनी केले.

