पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून अवैध धंदे पावसाळ्यातील शेतातील तणा प्रमाणे वाढले असून याला ग्रामीण भागात तर तरून पिढी दारू मटका गांजा अशा व्यसनाकडे वळल्याचे जाणवत आहे. या सर्वावर पोलीस खात्याबरोबर एक्साईज खाते अर्थात दारूबंदी अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालून पंढरी नगरीत व ग्रामीण भागातून गावठी हातभट्टी दारू वैद्य दारू धंदे यावर कायमस्वरूपी कारवाई करणे गरजेचे आहे.
पोलीस खाते आपल्या परीने अशा अवैध्य धंद्यावर कारवाई करते परंतु सर्वात महत्त्वाची जबाबदारी असवैद्य दारू धंदे दारू धंदे बंद करणे ही दारूबंदी अधीक्षक कार्यालयाचे काम असल्याने या खात्याचे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. थातूरमातूर कारवाई करून कारवाईचा फारस केल्याचे अनेकांनी पाहिले आहे वास्तविक सत्य एवढे आहे की पोलीस खात्याने कारवाई केली तरी पुन्हा जागा बदलून हे अवैध धंदेवाले गावठी हातभट्टी दारू विक्री पुन्हा चालू करतात. परंतु दारूबंदी कार्यालय मात्र अशा प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे जाणवताना दिसून येत आहे. पोलीस खात्याला जसे इतर महत्त्वाची कामे बंदोबस्त व इतर काही महत्त्वाची कामे करावे लागतात तसेच काम दारूबंदी खात्याला आहे असे आजपर्यंत तरी ऐकण्यात नाही दारूबंदी खाते हे स्वतंत्र असून दारूबंदी खात्याला दारूबंदी करणे एवढेच काम असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना जाणवत आहे दारूबंदी खात्याने एका मोहिमेद्वारे ग्रामीण भागातून दारू धंद्याबाबत बंद करण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सदस्य स्थानिक सदस्य यांच्यामार्फत एक समिती नेमून या अशा अवैद्यरीत्यात चालणाऱ्या दारू धंद्यावर लक्ष ठेवण्याचे काम या समितीवर राहणार आहे ही समिती नेमताना ती शासकीय आहे की अशासकीय आहे याचा मात्र दारूबंदी खात्याने खुलासा कोठेच केलेला दिसत नाही दारूबंदी खात्यानेच याबाबत प्रामाणिक काम करणाऱ्या सदस्याची नियुक्ती करून संपूर्ण तालुक्यामध्ये अशा समित्या त्या ग्रामपंचायत मार्फत नियुक्ती करण्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला आळा बसल्याशिवाय राहणार नाही असे जाणकारातून बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर शहरापासून लगत असलेल्या शहराचाच भाग समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी टाकळी परिसरात अवैध दारू धंदे जुगार मटका चे प्रमाण वाढले असून त्याच्या तक्रारी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख ग्रामीण पोलीस अधिकारी तसेच दारूबंदी अधीक्षक यांच्याकडे गेल्यानंतर दारूबंदी खात्याने पावले उचलून लक्ष्मी टाकळी येथे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांच्या बैठक घेऊन यापुढे लक्ष्मी टाकळी येथे अवैध्य व्यवसाय करणाऱ्या वर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात येईल अशी माहिती एक्ससाइज खात्याचे अर्थात दारूबंदी कार्यालयाचे अधिकारी सावंत, खेत्री, कदम , पोलिस पाटील इरकल यांनी बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना करून एक समिती नेमली जाईल या समितीमार्फत लक्ष्मी टाकळीतील ही समिती करणार आहे असे दारूबंदी अधिकारी यांनी लक्ष्मी टाकळी येथे बोलताना सांगितले. आता लक्ष्मी टाकळीचा कायापालट होणार का समिती खरोखरच कार्यक्रम झाला का याकडे दुर्लक्ष करणार याकडे संपूर्ण टाकळी वासियांचे लक्ष लागलेले आहे.