पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथिल अंनता बाबू कैकाडी माने यांची व त्यांच्या बहिन व मुलांच्या नावे असलेली वडिलोपार्जित अशी २१ हेक्टर म्हणजे जवळपास ५२ एकर शेत जमिन पंढरपूर शहरालगत असलेल्या वाखरी ग्रामपंचायत हद्दीत होती सन २००७ साली कैकाडी माने यांनी या शेत जमीनीचा व्यवहार जळगाव येथिल मे.छोरीया प्रॉपर्टीज ॲन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्याशी केला होता परंतु त्यांच्या त्या व्यहाराचा काही कारणांवास्तव वादविवाद हा आजही महसूल व न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती माने यांनी दिली.
त्याच बरोबर त्यांनी पंढरपूर येथिल दुय्यम निबंधक वर्ग एक मध्ये जे जमिनीच्या व्यवहारातील विक्रीपञ खरेदी दस्त केला होता त्यामध्ये व पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडील अपिलात दाखल असलेल्या विक्रीपञातील दस्तात फरक असल्याचा आरोप कैकाडी माने यांनी केला आहे तर आपण गेल्या एक महिन्यापासून पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे देविचंद कन्हैयालाल जैन यांनी दाखल केलेल्या विक्रीपञ दस्ताच्या नकलेची लेखी स्वरूपात मागणी करुनही ते आपणास संबंधित विक्रीपञ दस्ताची नक्कल देण्यास टाळाटाळ का करत आहेत.
याची मला कल्पना आहे तसेच उपविभागीय कार्यालयाकडून सदर दस्ताची खरी नक्कल या सही शिक्या शिवाय फक्त झेरॉक्सच दिली जात असल्याचाही आरोप कैकाडी माने यांनी केला आहे.