सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाला सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून अद्यापपर्यंत अर्जित रजा रोखीकरण 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात आलेला नाही या बाबत आठ वर्षे उलटून गेली तरी गृहविभागाने राज्यसरकार कडे पाठपुरावा केलेला दिसत नाही.
महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण हे 6 व्या वेतन आयोगाप्रमाणे दिले जात आहे ही बाब राज्यातील पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्याची खंत व्यक्त करून महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण 7 व्या वेतनआयोगा प्रमाणे देण्यात यावेत अशी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.