पंढरपूर प्रतिनिधी रामदास नागटिळक तेज न्यूज
माळशिरस तालुक्यातील सिदाची वाडी येथे कै. बापूराव सिद व कै.सोपान टेके यांच्या स्मरणार्थ 12 सप्टेंब रोजी घेण्यात आलेल्या आट्यापाट्या सामन्यांमध्ये कौठाळी येथील जय हनुमान आट्यापाट्या संघाने प्रथम क्रमांकाचे 21 हजार रुपयाचे बक्षिस व ट्रॉफी मिळवली.
या सामन्यामध्ये प्रशांत नागटिळक, सचिन नागटिळक, कैलास नागटिळक, प्रवीण कांबळे सोमनाथ सप्ताह,रावसाहेब माने या खेळाडूंनी सहभाग घेतला. यावेळी उत्कृष्ट सुरकरी म्हणून प्रशांत नागटिळक यांचा सन्मान करण्यात आला. विजयी संघाने गुलालाची मुक्तपणे उधळण करत आनंद व्यक्त केला. संघाचे कौठाळी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यापूर्वी ही जय हनुमान आट्यापाट्या संघाने महाराष्ट्रा मध्ये विविध ठिकाणी यश संपादन केले आहे.

