पिलीव प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे कलाशिक्षक देवानंद गोंजारी यांचा इयत्ता दहावीतील वर्गमित्र (1986 ) च्या विद्यार्थ्यांनी सन्मान करण्यात आला.
गोंजारी देवानंद लक्ष्मण कलाशिक्षक न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शैक्ष : वर्ष २०२२/ २०२३ सोलापूर जिल्हा कलाशिक्षक संघातर्फे आदर्श कलाशिक्षक पुरस्कार व ज्ञानक्रांती सामाजिक संस्था मंगळवेढा यांचेतर्फे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार व इ अनेक शैक्ष . संस्थेमार्फत तसेच जिल्हा परिषद सोलापूर २००५ आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.
आज पर्यंत गोंजारी यांना निसर्ग भूषण , उपक्रमशिल शिक्षक , आदर्श कलाकार , मानदेशी मानरत्न , कृतीशिल शिक्षक , इ . त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबदल ३५ पुरस्कार मिळालेले आहेत .
त्याबद्दल इयत्ता दहावीतील वर्गमित्र (1986 ) च्या विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक देवानंद गोंजारी यांचा फेटा,शाल, श्रीफळ ,पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी भारत केवटे , किरण त्रिगुणे , बाळू कलढोणे , कैलास साठे , शिव शंकर डमकले , अशोक पिसे , राजेंद्र तावरे , सुनील लोहार, बाळासाहेब सरतापे , शब्बीर शेख , चिराग मुल्ला , सुधीर खटावकर , नसरुद्दीन काझी आदि मान्यवर उपस्थित होते.