इचलकरंजी प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्यावतीने कोष्टी समाजाचे मार्गदर्शक,प्ररणास्थान धर्मगुरू श्री गायत्री पीठ हम्मी येथील देवांग मठाचे मठाधिपती श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामीजी यांच्या बुधवारी २४ मे रोजी होणा-या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्व चौंडेश्वरी मंदिरात एकाचवेळी चौंडेश्वरी देवीस अभिषेक करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील ६१ मंदिरारांमध्ये हा अभिषेक होत आहे.मंगळवार पेठ,इचलकरंजी येथील देवांग मंदिरात यादिवशी सकाळी ७ वाजता अभिषेक करण्यात येणार आहे.सर्व समाजबांधवानी सकाळी ७ वाजता उपस्थित रहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते आणि देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अभिषेक होणार आहे. असे महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे महासचिव रामचंद्र निमणकर व देवांग समाजाचे खजिनदार संजयदादा कांबळे यांनी कळविले आहे.