भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील अभिषेक सुनील म्हेत्रे यांची रेल्वे विभागात अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अभिषेक म्हेत्रे म्हणाले, माझे शिक्षण केसकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणीत तर पदवी शिक्षण पुणे येथे झाले. पदवी घेतल्यानंतर एमपीएससी परीक्षा देण्यास सुरुवात केली. एक-दोन परीक्षेत अपयश आलं तरीही पुन्हा जोमाने अभ्यास करून परीक्षेत यश मिळवलं.माझी महाराष्ट्र शासनाची सहाय्यक नगररचनाकार म्हणूनही निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केले की अभ्यास करून यश मिळवता येते.
यावेळी पांडुरंगाचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, दिलीप भानवसे, सुनील म्हेत्रे,आर के गवळी, मोहन माने, विजय शिंदे, दिलीप वाघमारे, अमोल लिंगे, नागेश गवळी, गणेश जमदाडे, मयूर शिंदे,सोमनाथ पाटील,विजयकुमार मोटे,प्रशांत माळवदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.