भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील तेज न्युज परिवारास डॉ.बी.पी. रोंगे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून निवड झाल्या बद्दल व तेज न्युज चे संपादक प्रशांत माळवदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते फेटा, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रोंगे म्हणाले तेज न्युजच्या माध्यमांमधून आपले कार्य वाचत असतो. तेज न्यूज च्या बातम्या सर्व समावेशक असतात, कोणतीही न्यूज सखोल आणि अभ्यासपूर्ण असते.या पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा. तसेच उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.अशा शुभेच्छा रोंगे यांनी दिल्या.
यावेळी एलआयसी विकास अधिकारी रणजित जगताप,बजरंग चौगुले,शरद पाटील,रामचंद्र ढोबळे,पवन चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.