तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हातावर घडी तोंडावर बोट
भाग 2
तालुक्यातील जनतेचे आरोग्य वाऱ्यावर
सोलापूर प्रतिनिधी
रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टर वर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदीक्कीत पणे अक्कलकोट तालुक्यातील रुग्णावर उपचार करत आहेत या बोगस व वैद्यकीय व्यवसायचा परवाना नसलेल्या बोगस डॉक्टर मुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच तालुक्यातील बोगस डॉक्टर चा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई ची गरज आहे मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी अक्कलकोट यांच्याकडून कारवाई चे पाऊल उचलले जात नाही.
वैद्यकीय परवाना नसलेले अनेक बोगस डॉक्टर अक्कलकोट तालुक्यातील विविध भागात दवाखाने थाटून बेकायदेशीर रित्या वैद्यकीय व्यवसाय करत आहेत ही गंभीर बाब तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती नाही का? तालुक्यातील गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टर ची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टर ची कमी असल्याने अनेक रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात शिवाय सदरचा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील माहिती नसते त्याच बरोबर रुग्ण देखील त्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शैक्षणिक पात्रताविषयी अधिक चौकशी करत नाहीत.
आरोग्य विभागाकडून तालुक्यातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होतं नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसून येते अक्कलकोट तालुक्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून अक्कलकोट तालुका बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करत नसल्याची माहिती प्राप्त कागदपत्रानुसार मिळत असून तालुक्यातील जनतेचं आरोग्य वाऱ्यावर सोडले जात असल्याची चर्चा संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात होत असून या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.