पुणे प्रतिनिधी
केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शनपूर्वी पासून विविध कारणांनी चर्चेत असून हा चित्रपट समाजातील लव्ह जिहाद व त्या माध्यमातून सुरु असलेले हिंदु मुलींचे धर्मांतर या मोहीमेवर भाष्य करतो म्हणूनच त्याला विरोध करण्याचं काम काही स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेणारी मंडळींकडून होत आहे.
गेले अनेक दशक मुस्लिम तरुण हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करून त्यांचं मानसिक शाररिक खच्चीकरण करून धर्मांतर घडवून आणण्याचं प्रशिक्षण अनेक मदरसा आणि मौलवीं कडून सुरु असल्याचं नागरिकांच्या बोलण्यातून पुढे आले आहे . आपल्या राज्यातील हिंदु मुली अश्या पद्धतीने नागवल्या जात असताना त्यावर प्रकाश टाकून हिंदु मध्ये जनजागृती करणारा असा चित्रपट प्रदर्शित होत आहे व त्याला नागरिकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत असताना,
म्हणूनच पतित पावन तर्फ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करण्यात आली आहे . जेणेकरून या चित्रपटाला महाराष्ट्राच्या चांदा ते बंद्यापर्यंत राहणाऱ्या सर्वसामान्य हिंदूपर्यंत हा सामाजिक विषय पोहचवण्यासाठी केरला स्टोरी हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी आग्रही मागणी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे राजाभाऊ पाटील विजय क्षीरसागर यांनी केली आहे.

