सोलापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर व ग्रामीण विभागाची महाबैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे संपन्न झाली.आपले नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचीही विशेष उपस्थिती या बैठकीस होती.
या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्यात व शहरात सुरू असलेल्या पक्ष संघटना कार्याचा आढावा घेतला.पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत मनमोकळा संवाद साधत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प.महाराष्ट्र संघटनमहामंत्री मकरंद देशपांडे, खा.जयसिद्धेश्वर स्वामी, खा.रणजितसिंह निंबाळकर,जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.सुभाष देशमुख,आ.विजयकुमार देशमुख, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील आ.राजेंद्र राऊत, आ.राम सातपुते, आ.समाधान आवताडे, मा.आ.प्रशांत परिचारक, जिल्हा संघटनमंत्री धैर्यशिल मोहिते-पाटील, शशिकांत चव्हाण,पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.