कर्णाटकात काँग्रेसची सत्ता, देशात परिवर्तनाची नांदी, मोदींच्या हुकूमशाही, बेबंदशाहीला चपराक, भाजपच्या पतनास सुरुवात :- चेतन नरोटे
जनतेचा, बजरंगबलीचा आशीर्वाद काँग्रेसला
सोलापूर प्रतिनिधी
सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा प्रचंड विजय झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णाटकमधील विजयाचा जल्लोष बाळी वेस विजयी चौक सोलापुर येथे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष भारत जाधव, शिवसेना शहर अध्यक्ष विष्णु कारमपुरी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रमोद गायकवाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी काँग्रेस पक्षाचा विजय असो, जय बजरंगबली तोड़ दिया भाजपाकी नली, जय बजरंगबली तोड़ दिया भ्रष्ट्राचार की नली, राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, आ. प्रणिती शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अश्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीत प्रधानमंत्री मोदी यांनी ही स्वतःच्या प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती. पूर्ण ताकद पणाला लावली होती. बजरंगबली आणि धार्मिक ध्रुवीकरणाची निवडणूक बनवली होती. त्याचबरोबर पूर्ण केंद्रीय मंत्रमंडळ, भाजपाशासित सर्व राज्याचे मुख्यमंत्री, मोदींचे रडगाणे या सर्वांचा वापर केला गेला. पण काँग्रेसने स्थानिक आणि लोकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर लढली महागाई, बेरोजगारी, गॅस सिलेंडर किंमतीची आठवण, भाजपचा 40 टक्के भ्रष्ट्राचार, धार्मिक ध्रुवीकरण या विषयांवर निवडणूक लढली. ही निवडणूक कौल स्पष्टपणे दर्शवतो कर्नाटक मधील जनतेने धार्मिक मुद्द्यांचा पुढे जाऊन हुकुमशाही संपविण्याकरीता आपला मतदानाचा हक्क बजावला आहे देशात आता धार्मिक ध्रुवीकरण चालणार नाही हे स्पष्ट आहे. आणि बजरंगबलींचा आशीर्वाद काँग्रेस पक्षाला लाभला. कर्नाटक विधानसभा निवडणूक कॉंग्रेस पक्ष ताकदीने लढला. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धरामय्या, DK शिवकुमार, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व नेते एकदिलाने प्रचारात सहभागी झाले त्यांच्या प्रयत्नाला यश लाभले. आ. प्रणिती शिंदे यांच्यावर ज्या दावनगिरी लोकसभा क्षेत्रातील आठ विधानसभा सहा ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. यासाठी मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे, सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार, विजयी उमेदवारांचे अभिनंदन. आत्ता कर्णाटकातुन भाजपची परतीची लाट सुरू झाली आहे. आगामी काळात महाराष्ट्रात सुद्धा याचा प्रभाव पडून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय होईल.
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस नरसिंग आसादे, माजी महापौर सुशिलाताई आबूटे, मा. नगरसेवक हाजी तौफ़ीक़ हत्तूरे, विनोद भोसले, मा. वैष्णवीताई करगुळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, संतोष केंगनाळकर, संभाजी कोंडगे, हरिदास दुद्याल, राष्ट्रवादीचे प्रमोद भोसले, श्यामराव गांगर्डे, संजय जाबा, विजय भोईटे, काँग्रेसचे अंबादास करगुळे, ब्लॉक् अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, NK क्षीरसागर, अंबादास गुत्तिकोंडा, विश्वनाथ साबळे, नागनाथ कदम, हाजीमलंग नदाफ, रॉकी बंगाळे, सिद्राम अट्ठेलूर, तिरुपती परकीपंडला, हनमंतु सायबोलू, दिनेश म्हेत्रे, सिद्धाराम चाकोते, सिद्राम आनंदकर, जाबिर अल्लोळी, अशोक कल्शेट्टी, अनिल मस्के, प्रवीण वाले, विश्वनाथ दुर्लेकर, शकील मौलवी, प्रवीण जाधव, दीनानाथ शेळके, संजय गायकवाड़, नूर अहमद नालवार, शरद गुमटे, रफीक चकोले, करीमुनिस्सा बागवान, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, अरुणा वर्मा, श्रद्धा हुल्लेनवरु, संध्या काळे, संघमित्रा चौधरी, उपेंद्र ठाकर, सोहेल कुरेशी, सोहेल शेख, वसिष्ठ सोनकांबले, चक्रपाणी गज्जम, रजाक कादरी, सुनील सारंगी, सत्यनारायण संगा, प्रतीक आबूटे, अप्पासाहेब बगले, सहदेव इप्पलपल्ली, विवेक कन्ना, पृथ्वीराज नरोटे, लखन गायकवाड़, सायमन गट्टू, शकील शेख, कय्यूम बलोलखान, मल्लीनाथ सोलापुरे, भोजराज पवार, विवेक इंगळे, अप्पासाहेब सलगर, श्रीशैल रणधीरे, मनोहर माचर्ला, शकील शेख, राजेन्द्र शिरकुल, शाहु सलगर, चंद्रकांत टिकके, शोभा बोबे, मुमताज शेख, लालू सानी, बसंती सालुंखे, मुमताज तांबोली, मनोहर चकोलेकर, सुनीता बेरा, नीता बनसोडे, चंदा काळे, पूजा नुल्लूरवार, शकूर शेख, अभिलाष अच्युगटला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.