पंढरपूर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून विद्यापीठाच्या पहिल्या १० रँकमध्ये स्वेरीच्या ११ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. त्यामुळे, विद्यापीठीय परीक्षांच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत पंढरपूरच्या स्वेरीचा झेंडा पुनःश्च फडकला आहे.
तंत्रशिक्षणातील 'पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन', उत्कृष्ट प्लेसमेंट, उत्कृष्ट संशोधन सुविधा, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, उत्कृष्ट मानांकने आणि आदरयुक्त शिस्त या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरीची सध्या तंत्रशिक्षणात सुरू असलेली दमदार वाटचाल होय. या सर्व बाबींकडे स्वेरीच्या व्यवस्थापनाचे व प्राध्यापकांचे विशेष लक्ष असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील पालकांच्या मनात स्वेरीचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्याच्या स्वेरीच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या १० रँकमध्ये आलेले
प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील ११ विद्यार्थी खालील प्रमाणे- पायल धनाजी खरात (दुसरी), प्रतीक्षा पद्माकर कार्लेकर (तिसरी), चंद्रशेखर संजय विजापुरे (पाचवा), श्रुती विजय गणेचारी (सहावी), वैष्णवी साहेबराव चव्हाण (सातवी), सोनाली राजकुमार करवीर (सातवी), प्राची राजाराम कोकरे (आठवी), सिमोन जहांगीर तांबोळी (आठवी), श्रावणी सचिन दिंडोरे (नववी), वैष्णवी हरीदास गवळी (नववी), शुभांगी उत्तम शितोळे (दहावी).
या शिवाय एकूण ४५ विद्यार्थ्यांना एस.जी.पी.ए नुसार १० पैकी १० ग्रेड पॉइंट मिळालेले आहेत. २७ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण तर १८३ विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. सर्वात विशेष म्हणजे तब्बल ३४७ विद्यार्थी विशेष श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. रात्र अभ्यासिका, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष, उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज वाचनालय, अभ्यासासाठी मुबलक संदर्भ पुस्तके आणि योग्य मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास या बाबींमुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेच्या निकालात गरुड झेप मारली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे यांच्यासह सर्व वर्गशिक्षक व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.