सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री. बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था संचलित श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री. भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 87.87%.
माध्य.व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कडून फेब्रुवारी/ मार्च. 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 87.87% लागला असून, महाविद्यालयाने निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवून दक्षिण सोलापूर तालुक्यात घोडदौड कायम ठेवली.
या परीक्षेस कला शाखेतून एकूण 33 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.एकूण 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात एकूण 3 विद्यार्थी विशेष प्रावीण्य,प्रथम श्रेणीत 6,विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 15, व पास 5.असे एकूण 29 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहेत.यातील यशाचे मानकरी
1)कु.रोहिणी शांत कुमार बिराजदार -(466) 77.67%.
2) कु.अंबिका देविदास खांडेकर -(465) 77.50%.
3) कु. अजय संतोष नवगिरे (464)77.33%
निकाल ऐकून वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे, अतिशय आनंदाने काशी महापीठाचे नूतन जगद्गुरु श्री.श्री.श्री.1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर परमपूज्य डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी सर्वांना शुभाशीर्वाद दिले.श्री.बृहन्मठ होटगी मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, अभिनंदनरुपी आशीर्वाद दिले.
संस्थेचे सचिव श्री.शांतया स्वामी सर,संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य श्री.केदार माळी,पर्यवेक्षक श्री. रामेश्वर झाडे,ज्येष्ठ प्राध्यापक. स्वामीनाथ कलशेट्टी, प्रा.मल्लिनाथ हुलसुरे,प्रा.दत्तात्रय बिराजदार,प्रा. सचिन होटगे, शामराव बगले सर यांचे अभिनंदन व कौतुक केले. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व समस्त ग्रामस्थ,पालक आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुकपर अभिनंदन केले.