सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचा निकाल अनुक्रमे विज्ञान शाखेचा १०० टक्के , वाणिज्य शाखेचा ९८.८२ टक्के तर कला शाखेचा ९३.८४ टक्के इतका निकाल लागला.
विज्ञान शाखेत स्वामींनी वग्गा (७७.१७), पूजा शिरगे (७७.००), सोनाली माने(७६.५०),
वाणिज्य शाखेत राजेश्वरी बिंगी(६९.६७), अर्चना खुणी (६८.३३), महालक्ष्मी यंगलदास (६८.१७),
कला शाखेत सरस्वती भोरगुंडे(८४.८३), निकीता मुळे(८०.८३), विश्वनाथ सलगर(७५.१७) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक पटकाविले.या विद्यार्थ्यांना प्रा.अंगद तोरणे,प्रा.शांतेश करजगी,प्रा.अमरनाथ दुस्सा,प्रा.दीपक नरोणे,प्रा.पिरप्पा अंबारे,प्रा.महेश नराल,प्रा.गणपती पाटील, प्रा.चंद्रशेखर पाटील, प्रा.गीता चव्हाण,प्रा.राजश्री स्वामी,प्रा.विद्या चिक्काळे, प्रा.प्रज्ञा धुमशेट्टी आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदींनी अभिनंदन केले.