सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दि. 30 एप्रिल 2023 रोजी होत असून, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत (ग्रामीण भागामध्ये) परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षेचे अनुषंगाने दि. 30.04.2023 रोजी सकाळी 09.00 वा. ते दृ. 13.00 वा. या कालावधीत लागू राहील. या आदेशाची अवमानता केल्यास भारतीय दंड विधानाचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
यानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तिकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे इत्यादी दळणवळणाची माध्यमे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन, पेजर सारखी दुरसंचार साधने व इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, स्मार्ट वॉच, फॅक्स, ई- मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून परीक्षार्थीना प्रवेश करणेस मनाई असेल.
कोणत्याही व्यक्तिकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तिंना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले मुख्याध्यापक/ कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी संबंधित शाळेतील परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना प्रवेश असणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटरचे आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 09.00 वा. ते दु. 13.00 वा. या कालावधीत ध्वनीक्षेपके बंद ठेवावीत.
हा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी, परीक्षा उपकेंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचे बांबत त्यांचे परीक्षेसंबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. आयोगाने परवानगी दिलेल्या व्यक्तिंनाच भ्रमणध्वनीचा वापर करता येईल. इतर सर्वांना भ्रमणध्वनी नेण्यास बंदी असेल.
परीक्षा केंद्र व संबंधित पोलीस स्टेशनची नावे खालीलप्रमाणे :-
स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), बाळे बार्शी रोड, सोलापूर (पो. ठाणे :- तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ), मौलाना आझाद पॉलिटेक्निकल, ॲट पोस्ट होटगी कुंभारी रोड, सोलापूर (पो. ठाणे :- वळसंग पोलीस ठाणे ), नागेश करजगी, आर्कीड कॉलेज ऑफ इंजिनिरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी तुळजापूर रोड, सोलापूर ( पो. ठाणे :- तालुका पोलीस ठाणे, सोलापूर)