सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरातील बिडी,यंत्रमाग व असंघटित कामगारांना १ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन असून १ मे २०२३ रोजी ऐतिहासिक व राष्ट्रीय दिन असून सण साजरा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बिडी, यंत्रमाग व असंघटित कामगारांना पगार सुट्टी जाहीर करून असा आदेश सर्व संबंधित अस्थापना (मालकांना) देण्यात यावे अशी मागणी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विष्णु कारामपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सायबण्णा तेग्गेली, श्रीधर गुडली, ॲड. मुनीनाथ कारमपुरी, प्रवीण सलगर, अंबन्ना कोळी, गुरुनाथ कोळी, यांच्यासह महिला व पुरुष कामगार यांचा सहभाग होता.