ठाणे प्रतिनिधी
जात,धर्म,पंत अन् राजकीय अभिनिवेश बाजूला सारून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे.मोठ्या मनाने रुग्णसेवा केल्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिके सातत्याने प्राप्त होऊन ह्या सेवाभावी संस्थांना जागोजागी सन्मानित केलं जात आहे,ही महाराष्ट्रीय लोकांच्या दृष्टीने अभिमानाची आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे गोरगरीब रुग्ण अन् त्यांच्या कुटुंबियांची दुवा अन् आशिर्वादही भरभरून मिळत आहेत. रुग्णसेवेचं सत्कर्म दृष्टी हेच खऱ्या अर्थाने या घवघवीत यशाला कारणीभूत ठरत असते.
या यशाचे खरे मानकरी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटेसर असून,त्यांचे व त्यांच्या वैद्यकीय टीमच्या कठोर परिश्रमाचे हे खरं फलित आहे.कारण रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. जय महाराष्ट्र!
पत्रकार रणवीरसिंह राजपूत,ठाणे(प.)