पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेले ओंकार पवार व वैभव काळे या २ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
२९ डिसेंबर २०२२ मध्ये आय. बी. पी. एस. यांच्याकडून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत साहाय्यक अभियंता या पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील जवळपास १७७५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या ओंकार पवार व वैभव काळे यांनी सहाय्यक अभियंता परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. राजेंद्र पाटील, डाॅ. श्रीगणेश कदम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अनिल निकम, प्रा. अंजली चांदणे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.