भाळवणी प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल ,भाळवणी तालुका पंढरपूर येथील सन १९७२/७३ विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक दिवे सर, काटकर सर , ध्यावरकोंडा सर , खटकाळे सर ,विद्यमान प्राचार्य एन एम गायकवाड आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सन १९७२/७३ मधील इयत्ता अकरावी ( जुनी) सर्व वर्ग मित्र मैत्रिणींचा सस्नेह सानंद मेळावा शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ सकाळी ९ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत स्थळ नवे श्रीराम मंदिर शुक्रवार पेठ , भाळवणी येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आयोजक कल्याण कलढोणे (9766477031) व मोहन माने यांनी दिली आहे.