भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात पंढरपूर तहसील कार्यालय अंतरगत ई पीक पाहणी संदर्भात समाधान घुटुकडे ,अप्पर तहसीलदार ,पंढरपूर (परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी) यांचे अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.यावेळी सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते भाळवणी अप्पर तहसीलदार समाधान घुतुकडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी घुटुकडे म्हणाले,की जास्तीत जास्त खातेदारांना ई पीक नोदणी मोबाईल वर करण्यास सांगावे. शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.
यंदा रब्बी हंगामातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.ही नोंद करण्यासाठी राज्य सरकारनं ई-पीक पाहणी नावाचं अॅप विकसित केलं आहे. याचा उद्देश खातेदारांना प्रशिक्षण देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी आहे .
या कार्यक्रमाचे आभार तलाठी पी डी शिंदे यांनी मानले.यावेळी ग्राम.सदस्य,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.