अकलूज प्रतिनिधी
निमगाव ता माळशिरस ग्रामपंचायतीने नुतन पदाधिकारी निवङी झाल्यानंतर विकास कामे व ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सुभाष साठे होते.
ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी यांना सर्व सामान्य नागरिकांची घरकुल मधुन नावे कशासाठी वगळली ग्रामपंचायती च्या पाणी व घर पट्टी वसुली बाबत दुजाभाव का करता रेशन कार्ड कधी मिळणार आशी विचारणा ग्रामसेवका कङे केली माञ भाऊ साहेबांना समाधान कारक उत्तरे देता न आल्याने ग्रामस्थांच्या रोषाला समोरे जावे लागले.
घरकुल प्रश्न वर ग्रामसभेत संपूर्ण चौकशी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला या वेळी उपसरपंच नंदकुमार मगर पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख पशुवैधकीय आधिकारी ङाॅ. चुकेवार कृषी सहाय्यक बंङगर व ग्रामपंचायतीचे सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते सरपंच सुभाष साठे यांनी आभार मानले.