पंढरपूर प्रतिनिधी
सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वादो स्पर्धेत द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथील सिया शाहू सतपाल हिने प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तीचा सत्कार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे शाखाअभियंता दत्तात्रय कांबळे उपस्थित होते.
या स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मधील मनीषा गुंड,सिहगड पब्लिक स्कूल मधील तेजस्विनी राऊत,विठ्ठल प्रशालेच्या सृष्टी खडतरे, अरिहंत पब्लिक स्कूल मधील वीर पवार,प्रज्वल पाटील,या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवले,या सर्व विध्यार्थीना दिव्या स्पोर्ट क्लब पंढरपूर चे महेश गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शारीरिक शिक्षण खूप महत्त्वाचे असून मुलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालकांनी सहकार्य करून मुलांची प्रगती साधावी असे मत भाजपा वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार यांनी व्यक्त केले.
या विध्यार्थी चा सत्कार डॉ.अनिल जोशी,शुभांगी जोशी,दीपाली सतपाल,द.ह.कवठेकर प्रशाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी, युवराज कांबळे यांनी केला.