सोलापूर प्रतिनिधी
नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेत तिळगुळ व हळदी कुंकूवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाने महिला पालक भारावून गेल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार होत्या.प्रमुख अतिथी म्हणून माता पालक संघाच्या सचिवा पूनम चव्हाण उपस्थित होत्या.
प्रथम सहशिक्षिका सुनीता पवार यांनी तिळगुळ व हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितल्या. त्यानंतर सर्व महिला पालकांना मांगल्याचा प्रतिक हळदी कुंकू व वाण साहित्य देऊन मकर संक्रांत सण साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार म्हणाले, तिळगुळ व हळदी कुंकू या कार्यक्रमाने भारतीय संस्कृती जपली जाते.आजच्या मोबाईलच्या युगात आपण एकमेकांना सहज भेटत असलो तरी महिलांना या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हळदी कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. यामुळे आपली पंरपरा टिकून राहते.एकमेकींच्या सुख दुःखात सहभागी होणे हेच आदर्श स्त्रीचे कर्तव्य आहे. सामाजिक ऐक्य टिकण्यासाठी महिलांचा सन्मान, आदरसत्कार, गृहिणी पूजन आवश्यक असल्याचे सांगितल्या.
सचिवा चव्हाण म्हणाले, हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाने एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण होते. आज आपण 'चूल मुलं ' यातच न रहाता स्वावलंबनासाठी विविध उपक्रम व स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केल्या. कार्यक्रमास दीडशेहून अधिक महिला पालक उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना आकळवाडी यांनी केले तर जगदेवी निंबर्गी यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारती पाटील, जगदेवी निबर्गी,जगदेवी प्रचंडे यांनी परिश्रम घेतले.