केसकरवाडी प्रतिनिधी बिरुदेव केंगार
सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते प्रणवमालक परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्त. केसकरवाडी येथे जिल्हा परिषद शाळा केसकरवाडी मध्ये मुलांना जेवणाचे डब्बे व खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी युटिपियन शुगर MD मा. रोहनमालक परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील नितीन केसकर यांनी शाळेतील मुलांना जेवणाचे डब्बे व खाऊ देऊन हा सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला.
या प्रसंगी गावातील पांडुरंग परिवारातील परिचारक प्रेमी हणमंत भीमराव केसकर, तुकाराम केसकर, आप्पा मासाळ, उतरेश्वर केसकर, आण्णा मासाळ, हणमंत केसकर, तात्यासो मासाळ, अब्बास मुजावर,लहू केसकर, केराप्पा केसकर प्रकाश केसकर, लक्ष्मण सुरवसे, खुदबुद्दीन मुजावर, अब्बास इस्माईल मुजावर, अनिल मासाळ, मायाप्पा केसकर, अंकुश गायकवाड, धुळदेव केसकर, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विष्णू केसकर यांनी केले.