सोलापूर प्रतिनिधी
ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी AR न्यूज नेटवर्क चे संपादक जेष्ठ पत्रकार रवींद्र सोरटे यांची निवड करण्यात आली.
असून डॉ रवींद्र सोरटे हे गेली 32 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत असंख्य मानसिक व मनोशारीरिक रुग्णांना नव संजीवनी प्राप्त करून दिली असून ते स्वर्गीय प्रा. मनोहर नाईक यांचे शिष्य आहेत त्यांनी आजतगायत संपूर्ण महाराष्ट्रभर संमोहन कार्यक्रम व व्याख्यान आयोजन करून या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार केला आहे सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना महिला विभाग जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई सुना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष महिला विभाग सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ डॉ अलका सोरटे शहर संघटक श्रीकांत कोळी शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) राजाभाऊ पवार बाळकृष्ण सदाफुले विजय चव्हाण संदीप चव्हाणअ सत्तार डोंगरी जेष्ठ पत्रकार बाबा काशीद रवी पवार इत्यादी उपस्थित होते