सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना म्हणजेच चंद्रभागा सहकारी साखर कारखाना वेगाने घोडदोड करतोय
सोलापूर जिल्ह्यातील प्रगत कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्याचे काम चंद्रभागा सहकारी साखर कारखाना करतोय त्याचबरोबर सरत्या वर्षाला स्मरून दोन लाख टनाचा दुसरा टप्पा आज पूर्ण होतोय मिशन पाच लाख करण्याच्या दृष्टीने कारखान्याने वेगाने घोडदौड सुरू केलेले आहे आघाडी घेतलेले आहे
पुढच्या वर्षाच्या स्वागताला पाच तारखेच्या दरम्यान डिसेंबर अखेरच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणे चंद्रभागा साखर कारखाना पूर्ण करतोय
ऊस तोडणी वाहतूकदारांची या पाठीमागील सर्व देणे त्यांच्या खात्यावर अदा केले आहेत
कामगारांचे संपूर्ण पगार दर महा व्यवस्थित दिले जात आहेत
तीनच महिन्यामध्ये कारखान्यांना संपूर्ण क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे .
या कारखान्यांना नेहमीच सामान्य शेतकऱ्याच्या हिताचाच विचारकेला आज ही कारखान्याने पंढरपूर तालुक्यातील सामान्य शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून सामान्य शेतकरी कामगार प्रशासन या सर्वांच्या एकजुटीने चंद्रभागेवर नेहमीच होत असलेले उशिरा दर देण्याचा किंवा उशिरा पगार करण्याचा आरोप कारखान्याने आज खुडून काढलेला आहे .
हे सगळं का घडतंय या कारखान्याचा कामगार या कारखान्याला ऊस उत्पादक पुरवठा करणारा शेतकरी कारखान्याचे प्रशासन अधिकारी वर्ग या सर्वांनी कारखान्याच्या मशीनची मशिनरीशी एकजीव होऊन केलेल्या कामाचं हे फलित आहे.
मित्रांनो अशीच एकजूट कारखान्याचे यशस्वीतेसाठी ठेवा यातच सर्वाच् उज्वल भवितव्य आहे मित्रांनो हा कारखाना आपला आहे या कारखान्याच्या जन्मापासून कारखान्याने लागण खोडवा हा प्रोग्राम कधीही विचारत न घेता सर्वांना सरसकट न्याय देऊन सन्मान देण्याचा प्रयत्न केला.
आज पंढरपूर तालुक्यात जे प्रगत कारखाने काम करत होते जे 86 ऊस पाहिजे असं म्हणून जे स्वतःला कारखान्यात प्रगत कारखाना किंवा गणमान्य कारखानाच होता गड म्हणून घेत होते त्यांनीही आता लागण खोडव्याचा विचार न करता सरसकट तोड सुरू केलेली आहे .मित्रांनो यात खूप मोठा फरक आहे लागण खोडवा सुरुवात करणारे आत्ता असणारे हेारखाने ही सामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून लागण खोडवा सरसकट तोडत नाहीत तर आज त्या प्रगत कारखान्यांना गरज आहे म्हणून तोडतायेत तेही या ठिकाणी ध्यानात घेण्याची गरज आहे कालपर्यंत यांना लागण खोडव्याची एलर्जी होती कालपर्यंत उसाच्या व्हरायटी विषयी बंधन होते आज मात्र ती बंधनं गळून पडलेली आहेत प्रगत कारखान्यांना सरसकट ऊसतोड सुरू केलेला बदल तुमच्यासमोर तुम्हाला दिसतोय हा बदल का झाला कोणामुळे झाला हे कधीही आपण सांगायला विसरलात .
मित्रांनो हा बदल विचारात घेण्याची गरज आहे कालपर्यंत नियम लावून कारखान्याचा विचार करणारी माणसं स्वार्थाचा विचार करणारी माणसं आज मात्र सरसकट लागन खोडव्याची तोड करून शेतकऱ्यांचा विचार करतोय म्हणून दाखवून देण्याचा प्रयत्न करतायेत मित्रांनो थोडासा विचार करा कालपर्यंत ऊस पुरवठादार तुम्हीच होता तेव्हा नियम तुम्हाला सांगितले जायचे आज ही ऊस पुरवठादार तुम्हीच आहात आज मात्र तुमची सोय सांगितली जाते हा बदल केवळ आणि केवळ चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीमुळे झालेला आहे हे मात्र आपण साकल्याण लक्षात घेणे गरजेचे आहे.
जे कारखाने आज विचार करत आहेत .तो विचार या कारखान्याने कारखान्याच्या जन्मापासून तुमचा केलेला आहे आज बदल एवढाच झालेला आहे की तुमच्या घामाचा दाम वेळेवर देण्याचा बदल केला तर इतर प्रगत कारखान्यांना गुडघे टेकाय लागायची वेळ चंद्रभागा कारखान्याच्या समोर आली
मित्रांनो हा कारखाना सामान्यांच्या कष्टाच्या जीवावर आणि सामान्यांच्या उद्धारासाठी निर्माण झाला ही मी यापूर्वीही सांगितलं आजही त्याचा मी पुनरुल्लेख करतोय कितीही संघर्ष करायची वेळ आली तरी ती करायची तयारी या कारखान्याने नेहमीच ठेवली मित्रांनो साथ तुमची हवी आहे आज कारखाना पाठीमागील देणे कोणतेही न ठेवता प्रगती करतोय मग पाच लाख टन कारखान्याचे गळीत करण्यासाठीच योगदान याच कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेण्याचे कर्तव्य आहे का नाही हेे आपणच सांगावं आज तुमच्या दारात ऊस मागा येणार आणि गेल्या वीस वर्षात तुमच्याकडे का आले नाहीत याचाही विचार तुम्ही केला पाहिजे हा कारखाना सामान्यांची सुखदुःख जाणणाराहे कारखाना आहे आणि त्यासाठी कारखान्याची निर्मिती झाली मित्रांनो स्वर्गीय वसंत दादा काळे यांचे पहिलं स्वप्न साकार होतय
यावर्षीचा मिशन पाच लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या कारखान्याचे हितचिंतक शेतकरी जमातींना एक दिलाने प्रयत्न करावा हीच मापक अपेक्षा दादाला स्मरण करतो
भुकेल्याची भूक तहानलेल्याची तहान संकट काळात भक्कम आधार या कारखान्याने नेहमीच दिलाय हे वेगळं सांगायची गरज नाही .
आणि त्याच आशीर्वादामुळे चंद्रभागा सहकारी साखर कारखाना आज प्रगतीच्या दिशेने अत्यंत वेगाने घोडदौड करतोय
सोलापूर जिल्ह्यातील ज्या दोन कारखान्यांनी नेत्र दीपक प्रगती केली ते म्हणजे चंद्रभागा सहकारी साखर कारखाना व श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा दोन्हीही कारखाने अडचणीतून मार्गक्रमण करत असलेले कारखाने आज सर्वांची देणे देऊन आकाशाला गरुड भरारीघेण्याचा प्रयत्न हे कारखाने करतायेत .नवे या कारखान्याने गरुड भराडी घेतलेली आता .
मित्रांनो एकजुटीने आणि एक दिला ना कुठलेही काम हाती घेतलं त्यात प्रामाणिकपणा असला का ते काम हे यशस्वी होतच
लवकरच चंद्रभागा सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यातील सर्वोच्च दर देण्याचे काम नक्कीच करेल आणि ते स्वर्गीय दादांचं दुसरं स्वप्न पूर्ण करेल पण मित्रांनो यासाठी साथ आपली हवी आहे ती आपण द्यालच
आज यशस्वी उद्दिष्ट पूर्तीच्या दुसऱ्या टप्प्याला शुभेच्छा देऊन कष्टकरी कामगार शेतकरी सभासद हितचिंतक कारखाना प्रशासन या कारखान्याचे स्पर्धक त्याचबरोबर या कारखान्याच् अहितचिंतनारे विघ्न संतोषी या सर्वांना सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नववर्षाच्या स्वागताला सर्वांना सुखी यशस्वी निरोगी आयुष्य व सन्माननीय बुद्धी मिळो हीच अपेक्षा . व्यक्त करतो
विठ्ठला सर्वांना दीर्घायुष्य दे विठ्ठला सर्वांना सुख दे
चंद्रभागेची घोडदौड अशीच चालू राहू दे कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनात सुख येऊ दे.