डोंबिवली प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात काम करण्याची तळमळ,विविध क्षेत्रात कार्य करण्याची उर्मी,असे डोंबिवलीतील व्यक्तीमत्व म्हणजे आधार इंडिया ट्रान्सफरमेशनचे उपाध्यक्ष,जनरल मॅनेजर-अॅडमिनिस्ट्रशन विभागाचे डाॅ.अमित अनंत दुखंडे.जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व संस्थेचे पदाधिकारी दत्ता कडुलकर,आत्माराम नाटेकर,ग्रुप सदस्य अभिजित मुणगेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. भेटीत डाॅ. अमित दुखंडे यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. डाॅ.अमित सर यांनी आपल्या जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला.
अगदी गावपातळीपासुन ते राज्य स्तरावर सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जनजागृती सेवा समितीच्या कार्याबद्दलही डाॅ.अमित दुखंडे यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या खेळीमेळीच्या चर्चा सत्रात संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,खजिनदार दत्ता कडुलकर,पत्रकार आणि संस्थेचे सल्लागार आत्माराम नाटेकर,ग्रुप सदस्य अभिषेक मुणगेकर यांनी सहभाग घेतला.