पंढरपूर प्रतिनिधी
वर्षाच्या सुरुवातीलाच प्लेसमेंट चा धडाका : टीसीएस, इन्फोसिस, कॅपजेमिनी सारख्या बहुaराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड होण्याचे प्रमाण अधिक.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची डिग्री हातात मिळण्या आगोदर च मोठ्या पगाराच्या नोकरी मिळत असून अभियांत्रिकीच्या २०२२ चे प्लेसमेंट संपता संपता, 2023 मध्ये पास आऊट होणार्या म्हणजेच सध्या तृतीय वर्षात शिकणार्या जास्तीत जास्त मुलांना कॅम्पस प्लेसमेंट मधून 6 ते 7 लाख रुपये पगारची नोकरी मिळत असून याही वर्षी कर्मयोगीने प्लेसमेंट मध्ये आपले सातत्य टिकवून ठेवले आहे.
यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीयरिंग या विभागामध्ये शिकणार्या अंजली कुनाले, आकांक्षा मुढे, ऋतुजा आसबे या विद्यार्थ्यांची टीसीएस या नामांकित कंपनीमद्धे निवड झाली आसून त्यांना 3.5 ते 7 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील ऐश्वर्या पाटील यांची इन्फोसिस या कंपनी मध्ये, नामदेव राऊत यांची कॅपजेमिनी मध्ये तर भाऊसाहेब कुलकर्णी यांची मार्क्वार्ड इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून त्यांना 3.5 ते 6 लाखांचे पॅकेज मिळाले. तसेच वृषाली गुरव, पार्थ परळीकर, सोहन झाडबुके, गायत्री कौलगे, समाधान कांबळे यांची कयू स्पायडर या कंपनीमद्धे निवड झाली आहे. तसेच उद्धव जाहिरे, संकेत मलशेट्टी, शुभांगी माळी यांची सायबर सक्सेस प्रा. लि या कंपनीमध्ये निवड झाली आहे. रोहन पाटील यांची अटॉस कंपनीत निवड झाली असून ३.५ लाखाचे पॅकेज मिळाले विशेष म्हणजे मागील वर्षी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून अभियांत्रिकीची डिग्री घेणार्या 28 विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे, त्यामुळे कर्मयोगीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागामध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा विशेष ओढा दिसत आहे. तसेच मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनीयरिंग डिपार्टमेंट मधील 85% हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कर्मयोगीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मेकॅनिकल विभागाचे प्रमोद पाटील व व प्रसाद कोनसरगी याना नुकतेच उमास प्रा. कंपनी मध्ये तब्ब्ल ४.५ लाखाचे पॅकेज मिळाले.
कर्मयोगीतून शिक्षण घेतलेल्या काही माजी विद्यार्थ्यांना सध्या 87 लाख पॅकेज असून ते परदेशामध्ये स्थित आहेत. कर्मयोगीचे शैक्षणिक व प्लेसमेंट मधील यश पाहता अभियांत्रिकीच्या क्षेत्रामद्धे कर्मयोगीने आपले विशेष महत्व प्रस्थापित केले आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. राहुल पांचाळ, सिव्हिल इंजिनीयरिंग चे विभागप्रमुख प्रा. ए टी बाबर, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीयरिंगचे विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले तसेच सर्व विभागाचे प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.