मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
शिक्षक लोकशाही आघाडी मुंबई यांच्या वतीने संघटनेत सक्रिय राहून व पुढाकार घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध तळमळीने लढणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांचा व त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा येत्या रविवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता दादर च्या आरजु सभागृहात रंगणार असून यावेळी आंतरराष्ट्रीय वक्ते आणि मुंबईच्या डब्बेवाल्यांवर सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्यावर पी एच डी करणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जनतेला संदेश देण्यासाठी स्वच्छता दूत म्हणून ज्यांची निवड केली.
ज्यांनी भारतात व परदेशात हजारो व्याख्याने दिली असे मनेजमेंट गुरू आणि ज्यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई, ठाणे,रायगड येथे शाळा-कॉलेजेस सुरू केली असे सुप्रसिद्ध डॉ. पवन अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी, राजेश सिंह आदी मान्यवरही यावेळी येणार असल्याची माहिती टीडीएफ चे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी दिली.