कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
रेल्वे,मग ती लोकल असो किंवा मेल एक्सप्रेस असो,आपल्या रोजी-रीटीसाठी या रेल्वेचा आपण उपयोग करतो असतो.लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात.रेल्वे ही आपली सर्वांची जीवनवाहीनी आहे.आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून दस-यापूर्वी रेल्वे सजवतो,त्याची मनोभावे पुजा करतो,याच अनुषंगाने प्रगती एक्सप्रेस मधील पूणे,लोणावळा,कर्जत येथील मासिक पासधारकांनी "प्रगती एक्सप्रेस"ची पूजा करुन प्रगती एक्सप्रेसच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रवाशांची आर्थिक उन्नती होवो,सर्व मासिक पासधारकांची भरभराट होवो,सुखशांती लाभो,असा आई जगदंबेपाशी आशिर्वाद मागितला.
या सदरा उत्सवात पूणे-लोणावळा मासिक पासधारक संदिप पानसरे,विजय मोरे,रतन जैन,सुमित आसुरे,दत्ता माने,लक्ष्मण भालेकर,सुभाष कोठारी,संजय वायदंडे,मुकेश भाई,प्रवीण शाह,विकास कोकणे,अविनाश पवार.तसेच कर्जत मासिक पासधारक=किरण वाघमारे,प्रभाकर गंगावणे,सागर तुबणे,नारायण मोरे,चेतन म्हसे,कैलास डाळींबकर,सुरेश ठाकरे,विनोद बोराडे,श्रीधर म्हसे,वसीम मुजावर,संकेत घेवारे,वैभव दगडे,संदीप ओसवाल,राजू मेस्त्री,गणेश झुरे,संदीप ठाणगे,संचिता भंडारी,सुवर्णा पालकर,अक्षता येलकर,सई सावंत,इरफान कर्णेकर,मेघा कोकाटे,अश्विनी कदम आणि सहकार्य करणारे सर्व मासिक पासधारक यांचे योगदान लाभले.
याप्रसंगी मोटरमन व गार्ड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्वांच्या अल्पोपहाराचीही सोय केली.अशा प्रकारे प्रगती एक्सप्रेस मधील मासिक पासधारकांचे दसरा संमेलन खेळीमेळीच्या वातावरणात,उत्साहात,यशस्वीरित्या संपन्न झाले.व एकमेकांना दस-याच्या शुभेच्छा देत"प्रगती एक्सप्रेस"कर्जत स्टेशनवरून मार्गस्थ झाली.