कासेगाव प्रतिनिधी
नवरात्र उत्सव 2022 निमित्त माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान प्रा आ केंद्र कासेगाव ता पंढरपूर यांच्यावतीने कासेगाव व परिसरातील सर्व गरोदर माता व किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणी मानस उपचार तज्ञ यांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. सौ. राहिताईदे शमुख होत्या तसेच
प्रमुख वक्ते डॉ.गडम मॅडम रेडिओलॉजिस्ट डॉ. बोधले मॅडम स्त्रीरोगतज्ञ, डॉ. उत्पात मॅडम मानसो उपचार तज्ञ यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.वैधकीय अधिकारी डॉ. संध्या पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.गुंजाळ मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी दौलतराव हायस्कूल कासेगाव येथील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.