सोलापूर प्रतिनिधी
पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नवरात्र उपवास केलेल्या देवी भक्त बंधू-भगिनींना फराळाचे कार्यक्रम करण्यात आले
पूर्व विभाग नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने उपवासाचे नवस केलेले देवीभक्त बंधू-भगिनींना सौ रेखा श्रीधर आडकी यांच्या वतीने शेकडो भक्तांना फराळ देण्यात आले.
प्रारंभी मंडळाचे संस्थापक :-विष्णू कारमपुरी (महाराज) व उत्सव समीतीचे अध्यक्ष :- राजशेखर रोडगीकर यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेचे पूजन व महाआरती करण्यात आले त्यानंतर भाविक बंधू - भगिनींनी श्रीदेवी मातेचे महामंत्र पठण करण्यात आले. त्यानंतर सर्व भक्तांना उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले. या सामुदायिक फराळ कार्यक्रमात सुमारे 500 देवीभक्तांनी लाभ घेतला.
विष्णू कारमपुरी (महाराज) राजशेखर रोडगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या फराळ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल कुऱ्हाडकर, अँड.मुनिनाथ कारमपुरी, गुरुनाथ कोळी, रेखा आडकी, अभिषेक चिलका, राधा आवार, अक्षय नंदाल, श्रीधर आडकी, प्रसाद जगताप, पप्पू शेख, रमेश चिलवेरी, शुभम कारमपुरी, हिरामणी मेरगु, आदींनी विशेष परिश्रम घेतले