पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (पंढरपूर) येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील (LY B.Tech) विद्यार्थिनी कु. दक्षता कोकाटे आणि कु. स्नेहल कांबळे यांची क्युंगशिन इंडस्ट्रियल मदरसन प्रायव्हेट लिमिटेड, केआयएमएल(Kyungshin Industrial Motherson Pvt. Ltd)(KIML), वराळे, पुणे येथे सशुल्क इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थिनींची इंटर्नशिप सुरू झाली असून, त्यांना ऑन-जॉब ट्रेनिंग (OJT) दरम्यान दरमहा ₹18,000 स्टायपेंड मिळणार आहे. OJT पूर्ण झाल्यानंतर त्यांना वार्षिक ₹3 लाखांचे वेतन पॅकेज मिळण्याची संधी आहे.
ही कंपनी ऑटोमोबाईल उद्योगासाठी इलेक्ट्रिकल घटक आणि वायरिंग हार्नेस निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थिनींच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्यविकास आणि प्रकल्पाधारित शिक्षणाच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक व प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विद्युत विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर, IEEE Student Branch Counselor, इंटर्नशिप समन्वयक श्री. एन. व्ही. खांडेकर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे विद्यार्थिनी, महाविद्यालय आणि विद्युत अभियांत्रिकी विभागासाठी अभिमानाची बाब निर्माण झाली आहे. पालक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

