भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वाढदिवस जयंत्या पुण्यतिथ्या उत्सव, लग्नकार्य साध्या पद्धतीने साजरे करावेत असे आवाहन मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाई समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, राज्यातील पाणथळ जागेतील पाणी साठा कमी कमी होताना दिसत आहे, पुढील वर्षीचा पाऊस पडेपर्यंत पाण्याचे नियोजन करणे प्रशासनाला ही कठीण जात आहे, अजून उन्हाळा बाकी आहे, बाष्पीभवन होऊन आणखी पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, या बाबतीत शासन वारंवार नागरिकांना सूचना देत आहे, त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, पशुपक्षी यांची ही अवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, शासनाच्या पाणी नियोजनाला नागरिकांनी सहकार्य करावे,बिचारा शेतकरी ही पावसाअभावी पिक घेऊ शकला नाही, विहिरी, तलाव, नद्या, पाणवठे यामधील पाणी झपाट्याने कमी होत आहे,
तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वाढदिवस जयंत्या पुण्यतिथ्या उत्सव लग्नकार्य साध्या पद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.

