इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
इंदापूर संचार या लोकप्रिय वृत्तपत्राने लोणी देवकर ता .इंदापूरच्या सेवानिवृत्त शिक्षिका स्वाती वा. तोंडे पाटील मॅडम यांची इंदापूर संचारचे संपादक सागर शिंदे व उपसंपादक मोहिनी शिंदे यांनी आदर्श वाचक म्हणून निवड करून संचारच्या वर्धापन दिनी त्यांना आदर्श वाचक पुरस्काराने कृषीमंत्री दत्तामामा भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या मान्यवरांच्या व तमाम संचारप्रेमींच्या उपस्थितीत त्यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व आकर्षक ट्राॅफी देऊन तमाम संचारप्रेमींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी संपूर्ण तोंडे पाटील परिवार,प्रदिप गारटकर ,जि प.सदस्य दिपक जाधव,माजी नगरसविका अंकिता शहा, अनुष्का भरणेताई ,नातेवाईक,इष्टमैत्रीणी, शिक्षक परिवार व तमाम हजारो संचारप्रेमी हा देखणा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.
जाता जाता संपादक महोदयांनी सर्वांना स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद देऊन व हा हर्षोल्हासित व निटनेटका, शिस्तबद्ध कार्यक्रम पाहून सर्वजण भारावून गेले.

