पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
*जे का रंजले गांजले*!
*त्यासी म्हणे जो आपला*!
*तोचि साधू ओळखावा*!
*देव तेथेच जा*!
कायम दुर्लक्षित असलेल्या प्रगतशील समाजातील शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना दिवाळी सणानिमित आकर्षक ड्रेस अनुलोम परिवारातर्फे भेट देण्यात आले.
विविध शाळा आणि विविध भागातील गरजू मुलींना सुमारे 200 आकर्षक ड्रेस दिवाळी सणाच्या निमित्ताने गोड भेट म्हणून देण्यात आले.
इयत्ता 5 वी ते 10 वी शिक्षण घेत असलेल्या आणि गरजू मुलींची विविध शाळांच्या माध्यमातून माहिती घेतली आणि शाळेत तसेच विविध वस्तीवर जाऊन वितरीत करण्यात आले.
अनुलोम ही संस्था शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचविण्याचे काम करीत असते.
या संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात असतात,तसेच गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष,तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार,शस्त्रक्रिया करण्यात येत असतात,निराधार मुलांसाठी तसेच एकल पालक योजनेतून मुलांना मदत मिळवून दिली जाते,तसेच विधवा ,निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे,तसेच प्रधान मंत्री आवास योजना,फुंडकर फळबाग योजनेतून बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला आहे,सध्या सौर ऊर्जा सिस्टीम साठी सबसिडी मिळवून दिली जात आहे.
या उपक्रमासाठी सोलापूर उपविभाग प्रमुख पांडुरंग शिंदे,पंढरपूर भाग जनसेवक रामेश्वर कोरे,अनुलोम मित्र विकास पाटील,अजित खिलारे,कुमारी वर्षा खिलारे,तसेच अनुलोम संस्थेचे प्रभावशाली व्यक्ती तुकाराम खंदाडे ,गिरीश भिडे , मुख्याध्यापक गुलाखे,भातलवंडे , प्राचार्य साळुंखे इत्यादी मान्यवर मंडळींनी सहाय्य केले

